पोस्ट्स

First Mayor Jalna लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ऐतिहासिक क्षण: जालना महानगरपालिकेला पहिली महापौर — वंदना अरुण मगरे निर्विरोध, राजेश राऊत उपमहापौर

इमेज
 जालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात सोमवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. विशेष सभेत प्रथमच महापौर आणि उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया पार पडली आणि दोन्ही पदांवर निर्विरोध निवड होऊन जालना शहराला पहिली महापौर लाभली. या ऐतिहासिक निर्णयानुसार वंदना अरुण मगरे यांची जालना शहराच्या पहिल्या महापौरपदी तर राजेश रामभाऊ राऊत यांची प्रथम उपमहापौरपदी घोषणा करण्यात आली. विशेष सभेचे आयोजन नवनिर्मित नगर निगम सभागृहात सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी व अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेची सुरुवात झाली. विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. “वंदे मातरम्”च्या घोषणेसह सभेची औपचारिक कार्यवाही सुरू झाली—हा क्षण जालना शहराच्या स्वराज्य संस्थात्मक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. महापौर पदावर निर्विरोध निवड महापौर पदासाठी निर्धारित वेळेत फक्त वंदना अरुण मगरे यांचेच नामांकन प्राप्त झाले. प्रस्तावक: महेश निकम समर्थक: रमेश गौरक्षक नामांकन पत्र वैध ठरल्यानंतर, नाम मागे घेण्याची मुदत संपताच सकाळी ११:३७ वाजता वंदना मगरे यांच्या निर्विरोध निवडीची अधिकृत घोषणा ...