💰 लाडक्या बहिणींना मोठी दिलासा बातमी! मकरसंक्रांतीला थेट ₹4,500 खात्यावर? जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
‘ माझी लाडकी बहीण योजना ’ अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासकीय हालचालींनुसार, सरकारकडून तीन महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्याची तयारी सुरू असून, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात ₹4,500 जमा होऊ शकतात , अशी माहिती समोर येत आहे. ❓ नोव्हेंबर–डिसेंबरचे पैसे का रखडले? राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया यामुळे नोव्हेंबरचा हप्ता वेळेत जमा होऊ शकला नाही . त्याचाच परिणाम डिसेंबर महिन्यावरही झाला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, सरकार दोन्ही हप्ते एकत्र देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 🎉 मकरसंक्रांतीला ₹4,500 मिळण्याची शक्यता जर हप्त्यांचे वितरण जानेवारी महिन्यात झाले, तर लाभार्थी महिलांना खालीलप्रमाणे रक्कम मिळू शकते: 🟡 नोव्हेंबर हप्ता – ₹1,500 🟡 डिसेंबर ...