🚨 MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन जाहिरात प्रसिद्ध | 87 पदांसाठी संधी – संपूर्ण माहिती.
राज्यसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026” साठी अधिकृत जाहिरात (क्रमांक 132/2025 ) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेमार्फत गट-अ व गट-ब मधील एकूण 87 पदांची भरती केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. 📌 MPSC Rajyaseva Notification 2026 – थोडक्यात माहिती परीक्षेचे नाव: Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Exam 2026 जाहिरात क्रमांक: 132/2025 एकूण पदे: 87 परीक्षेची तारीख: रविवार, 31 मे 2026 परीक्षा केंद्रे: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रे ⚠️ टीप: आयोगाने स्पष्ट केले आहे की, पूर्व परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी शासनाकडून अतिरिक्त मागणी आल्यास पदसंख्या वाढू शकते . 🏢 विभागनिहाय पदसंख्या 🔹 राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग) 79 पदे 🔹 महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (महसूल व वन विभाग) 08 पदे ➡️ एकूण: 87 पदे 📝 पदांचा सविस्तर तपशील (Post-wise Vacancy) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (उच्च श्रेण...